1.

१. नैसर्गिक संख्या: 1, 2, 3, 4, … या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.

  • या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
  • ‘0’ (शून्य) ही नैसर्गिक संख्या नाही.
  • सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.
  • नैसर्गिक संख्या अनंत आहेत.
  • सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही.
  • सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत.

२. पूर्ण संख्या: 0 (शून्य) व सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या संच तयार होतो. (0, 1, 2, 3, …)

  • सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात.
  • सर्वांत लहान पूर्ण संख्या 0 (शून्य) आहे. तर सर्वांत मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण पूर्ण संख्या अनंत आहेत.

३. पूर्णांक संख्या: धनसंख्या, ऋणसंख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

-4 -3 -2 -1 0 +1 +2 +3 +4

  • ‘0’ (शून्य) हा मध्यवर्ती बिंदू आहे.
  • उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे लहान होत जातात.
  • सर्वांत लहान धनपूर्णांक संख्या = 1
  • सर्वांत मोठी ऋणपूर्णांक संख्या = -1
  • ‘0’ हा धनपूर्णांकही नसतो व ऋणपूर्णांकही नसतो.
  • शून्य ही विषम संख्याही नाही आणि सम संख्याही नाही. मात्र एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य आल्यास ती समसंख्या असते.

४. विरुद्ध संख्या: ‘n’ ही जर एक नैसर्गिक संख्या असेल तर ‘-n’ ही त्या संख्येची विरुद्ध संख्या असते.

  • 1 ची विरुद्ध संख्या = -1 (ऋण 1)
  • 2 ची विरुद्ध संख्या = -2 (ऋण 2)
  • विरुद्ध संख्येची बेरीज शून्य येते.
  • ‘0’ ची विरुद्ध संख्या = 0
  • ‘0’ ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही.

५. सम संख्या: ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येस समसंख्या म्हणतात.

Scroll to Top