आमचे तज्ञ शिक्षक
आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) मधून शिक्षित

प्रभाकर गुंड, शिक्षक (मराठी माध्यम)
प्रभाकर गुंड हे नवोदय ॲप चे संस्थापक आहेत. ग्रामीण व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी घरबसल्या करता यावी, यासाठी त्यांनी हा डिजिटल शिक्षण उपक्रम सुरू केला. गणित, मानसिक क्षमता आणि मराठी या विषयांसाठी दर्जेदार व मराठीतून शिकवणारे कोर्स, टेस्ट सिरीज, आणि व्हिडिओंचे सुलभ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे त्यांच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षण:
* शाळा – ज. नवोदय विद्यालय, सोलापूर
* बी.टेक. – एनआयटी (NIT), नागपूर
* एम.बी.ए. – आयआयएम (IIM), मुंबई
नवोदय ॲप मधे भूमिका:
* NavodayApp संस्थापक
* शिक्षक – मराठी कोर्सस (गणित, मानसिक क्षमता, मराठी)

अमित कुमार, शिक्षक & सल्लागार (हिंदी माध्यम)
अमित कुमार हे नवोदय ॲप मध्ये हिंदी माध्यमातील शिक्षक आणि सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते गणित, मानसिक क्षमता आणि मराठी या विषयांचे हिंदी भाषेत मार्गदर्शन करतात. त्यांच्या अध्यापनशैलीमुळे विद्यार्थी विषय सहज समजून घेतात आणि आत्मविश्वासाने तयारी करू शकतात. तसेच, ते संस्था धोरण आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये सल्ला देतात.
शिक्षण:
* बी.टेक. – एनआयटी (NIT), नागपूर
* एम.टेक. – आयआयटी (IIT), मुंबई
नवोदय ॲप मधे भूमिका:
* शिक्षक – हिंदी कोर्सस (गणित, मानसिक क्षमता, मराठी)

पदमाक्ष गुंड, शिक्षक (मराठी माध्यम)
पद्माक्ष गुंड हे नवोदय ॲप मध्ये तंत्रज्ञान व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. ते मराठी माध्यमातील सर्व विषयांचे शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य आणि शिक्षणातील समर्पण यांची सांगड घालून ते विद्यार्थ्यांसाठी सहज, समजण्यासारखे आणि प्रभावी शिक्षण अनुभव उपलब्ध करून देतात.
शिक्षण:
* बी.इ. – सोलापूर यूनिवर्सिटी, सोलापूर
* बी.एस. – आयआयटी (IIT), मद्रास
नवोदय ॲप मधे भूमिका:
* शिक्षक – हिंदी कोर्सस (गणित, मानसिक क्षमता, मराठी)
* सॉफ्टवेयर डेवलपमेंट एंड मेंटेनेंस

धनश्री शिंदे, मार्केटिंग व विद्यार्थी व्यवस्थापन
धनश्री शिंदे ही नवोदय ॲप मध्ये मार्केटिंग, विद्यार्थी संपर्क, व्यवसाय विकास आणि धोरण आखणी या सर्व क्षेत्रांचे काम पाहतात. नवोदय अॅपच्या वाढीसाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन व सेवा मिळावी यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
शिक्षण:
* बी.सी.ए. – पुणे यूनिवर्सिटी, पुणे
* पी.जी डिप्लोमा – सीओइपी (COEP), पुणे
नवोदय ॲप मधे भूमिका:
* मार्केटिंग व विद्यार्थी व्यवस्थापन